If your browser dont support marking texts. Browse sms from here to copy sms

Display: old first
274 days ago (sushil143)[ Report ]

भेटूया का?..
ओथंबलेल्या घनात ..
त्या रिमझिमत्या पावसात ...!!!!
नको उघडूस ती छत्री,
जरा भिजुदेत ना सरी...!!!!
भेटूया का?..
झोंबत्या गार वाऱ्यात ..
त्या कोसळत्या धबधब्यात...!!!!
घेवुन हात तुझा हातात,
जरा सावरुदेत ना खडकात...!!!!
भेटूया का?..
उधळत्या सागर लहरीत ..
त्या बांधावर छत्रीत...!!!!
सामावत तुझ्या मिठीत,
जरा लाजुदेत ना खळीत...!!!!
भेटूया का?..
गोड गोड स्वप्नात ..
त्या फुललेल्या बनात...!!!!
हरवेन मी हरपेन मी,
पुन्हा शिरता त्या क्षणात...

#$.gifu#$.gifhil Raj

8177880945

! Rating: 6.3/10 from 160 Votes

293 days ago (sushil143)[ Report ]

तुला पाहताना फक्त
पाहतच राहावस वाटत...
तुझ्या डोळ्यात स्वतःला
सामावुन घ्यावावसे वाटते..
खरच..किती सुंदर कल्पना
असते ना प्रेमाची..
ज्याच्यावर आपण प्रेम करतो
त्याच्यासाठीच आयुष्य
जगावेसे वाटते..
आणि
त्याच्याच मिठीत
आयुष्य सरावेसे वाटते...

#$.gifu#$.gifHil ®@j
8177880945

! Rating: 6.5/10 from 265 Votes

293 days ago (sushil143)[ Report ]

एक ह्रदय फक्त तुझ्या साठीच धडधड करतय
सवयच आहे तिला ...सवयच आहे मला
सवयच आहे तिला
रोज विनाकारण माझ्यावर चिडण्याची
उगाच गाल फुगवून रुसून बसण्याची
सवयच आहे मला समजूत तिची घालण्याची
त्यात हि ती नाक मुरडायची
पण रागावल्यावर खूप सुंदर दिसायची
सवयच आहे तिला
कधी कधी मला खूप मारण्याची
स्वतःलाच लागले म्हणून ओरडण्याची
सवयच आहे मला खोटे खोटे नाटक करण्याची
त्यातही ती मला जवळ घ्यायची
लागले का म्हणून प्रेमाने विचारायची
सवयच आहे तिला
विनाकारण कोणत्याही गोष्टीवर भांडण्याची
उगाच चिडचिड करण्याची
सवयच आहे मला भांडण्यातला गुंता सोडवण्याची
त्यातही माझ्या चुका ती शोधायची
मधेच सारे विसरून मला प्रेमाने मिठीत घ्यायची
सवयच आहे तिला
भेटल्यावर मी उशिरा आलो म्हणून वाद
घालण्याची
माझ्याशी कट्टी घेवून शांत बसण्याची
सवयच आहे मला समजूत तिची काढण्याची
पुढल्या खेपेस लवकर ये म्हणून वचन ती
मागायची
मन तिचे शांत होताच हातात हात धरून फिरायची
सवयच आहे तिला
जाताना घरी लहान मुलासारखे रडण्याची
अलगद गालावर मुका देण्याची
सवयच आहे मला स्वतःचे दुख लपवण्याची
जाताना हसत जा म्हणून तिला सांगायची
ती पुढे गेल्यावर स्वतःचे डोळे पुसण्याची...

#$.gifu#$.gifhíł raj

! Rating: 6.3/10 from 221 Votes

293 days ago (sushil143)[ Report ]

मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय ग़
अजुन ही तुला हे कसे कळत नाही
तू नसताना ही तुझ्या आठवणीतच असतो
तू असतेस तेव्हा ते प्रेम तुला कसे कळत नाही
कधी पासून प्रेम करतोय तुझ्यावर
माझे मलाच ठाऊक नाही
पण एवढे मात्र नक्की आहे की
आता तुझ्या शिवाय मला काहीच ठाऊक
नाही
तू नसतेस पण असे कधी वाटले ही नाही
तू असतेस कायम माझ्या मनातल्या घरात
तुझा आभासच अधिक सुखावतो मला
तुझ्या असण्याहून ही प्रिय आहे जरा
मनातले बोल ओठांवर येत नाही कधी
तुझ्या दुरावण्याची भीती उगीच
मनी असते
तू असतेस तेव्हा बरेच काही बोलायचे असते
ते तसेच राहते आणि वेडे मन स्वत:शीच हसते
तुझी प्रतिमाच अधिक बोलते माझ्याशी
निदान माझे प्रेम तिला जाणवते तरी
पण मन पुन्हा स्वप्नातच रमते जागेपनी
प्रेम कळेल माझे तुला ही अन होशील
माझी कधी तरी.

#$.gifu#$.gifhíł Deore
8177880945

! Rating: 5.8/10 from 139 Votes

293 days ago (sushil143)[ Report ]

तुज बघता सारा हिशेब चुकला होता
मी अमावास्येला चंद्र पाहिला होता

तो एकच झाला गुलाब अवघा लाल
जो ओठांवरती तुझ्या टेकला होता

तालात नादली तुझी पैंजणे तिकडे
हृदयाचा ठोका इकडे हुकला होता

डोळ्यात अचानक उभ्या जळाच्या लाटा
मी डाव प्रीतीचा पहिला शिकला होता

निथळता चांदणे असह्य अंगावरती
मी चंद्र तुझ्या वस्त्राने टिपला होता

तू मिठीत घेता श्वास थांबले होते
मज मारायचा डाव चांगला होता

पाहिले जयाने तुझे लाजरे हासू
माणूस तो आयुष्यातून उठला होता

चढणार होते जहर तुला हे माझे
मी कवितेतून दंश ठेवला होता
सुशिल देवरे
८१७७८८०९४५

! Rating: 6.8/10 from 98 Votes

293 days ago (sushil143)[ Report ]

काळीज मी आणि ठोका तु
सोडून जातांना एकदा
तू मागे वळायचं होतं.....
तुझं माझं नातं
थोडं जपायचं होतं.....

पाठ फिरवली मी,
तु हाक मारायचं होतं....
लपवलेल्या अश्रुंना माझ्या
थोडं न्याहाळायचं होतं.....

काय हरवलं आहे आपल्यात ?
एकदा विचारायचं होतं....
अबोला धरला मी,
तु कारण ताडायचं होतं. ...

हसतांना मला बघुन ,
तु जरा गोंधळायचं होतं
एक हुंदका मी जपला,
तु ओळखायचं होतं....

स्वार्था पुरतीचं प्रेम माझं,
हे ही खरंच होतं....
पण स्वार्थातल्या या प्रेमात
एक "प्रेम" तेवढंच मुद्याचं होतं....

मार्ग आपले वेगळे, हे तर
शेवटी होणारच होतं...
स्वीकारायचं कसं.... हेच फक्त
कळत नव्हतं...

काळीज मी आणि ठोका तु एवढच
मला म्हणायचं होतं....
तुझं माझं नशीब, त्याने असच
का लीहायचं होतं....??


$u$hil raj
8177880945

! Rating: 6.4/10 from 81 Votes


Site: <.>.>>..4.5.6.7.8.9..207
Display: old first
कृपया फक्त मराठी संदेश पोस्ट करा. इंग्लिश हिंदी एस एम एस उडवले जातील
Name:

Text:

..:::मराठी फॉन्ट:::..
» प्रेम (1241)
» कथा (85)
» जोक (338)
» दुखी (250)
» इतर (201)
..:::ENGLISH FONT:::..
» Love (169)
» Good morning (46)
» Good night (44)
» Birthday (16)
» Life (39)
» Festivals (37)
» Funny (194)
» Story (9)
» Jock (257)
» Maitri (81)
» Sad (69)
» Other (41)